नेहरू उद्यानाला गळफास

By Admin | Updated: September 23, 2015 00:32 IST2015-09-23T00:31:30+5:302015-09-23T00:32:05+5:30

अतिक्रमण ‘जैसे थे’ : ‘कर्तव्यतत्पर’ आयुक्तांकडून कारवाईची प्रतीक्षा

Graft to the Nehru Park | नेहरू उद्यानाला गळफास

नेहरू उद्यानाला गळफास

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी जेथे सिंहस्थाचा संबंध नाही तेथील व्यावसायिकांचे ओटे, नामफलक हटविण्याची मर्दुमकी गाजविणाऱ्या महापालिका प्रशासनाला मात्र शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नेहरू उद्यानात चायनीज हातगाड्यांनी केलेले अतिक्रमण अद्याप हटविता आलेले नाही. नेहरू उद्यानाच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमणाचा हा फास प्रशासनाच्या कचखाऊ भूमिकेमुळेच अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. या अतिक्रमणामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ‘कर्तव्यतत्पर’ असलेल्या महापालिका आयुक्तांकडून सदर अतिक्रमणाविरोधी कठोर कारवाईची प्रतीक्षा केली जात आहे.
सारडा कन्या विद्यालयाजवळ असलेल्या नेहरू उद्यानात चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे.
महापालिकेने यापूर्वी नेहरू उद्यानाबाहेर लागणाऱ्या चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या हटविण्यासाठी उद्यानाभोवती संरक्षक भिंत बांधली परंतु मुजोर विक्रेत्यांनी थेट उद्यानामध्येच ठिय्या मांडत प्रशासनालाच आव्हान दिले आहे. याठिकाणी युनियनचा फलक लावून राजकीय दबावतंत्राचाही फंडा वापरण्यात येत आहे. या विक्रेत्यांनी आता नेहरू उद्यानाचाच कब्जा केला असून नेहरू उद्यानाऐवजी त्याला गार्डन हॉटेलचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Web Title: Graft to the Nehru Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.