चांदोरी : कॉनव्होकेशन म्हणजे एकत्र येणे,आपल्याला आज पदवी मिळतेय तिचा आनंद साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलोय. असेच कायम एकत्र राहून समाजाच्या प्रत्येक घटकाला या शिक्षणाचा लाभ करून देणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ.व्ही.बी. गायकवाड यांनी केले. मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पदवी वितरण समारंभात गायकवाड बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव कुणाल दराडे यांनी प्रास्ताविक केले.प्राचार्य डॉ.गजानन खराटे यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर प्रा.डॉ.नितीन जैन, प्राचार्य डॉ.वैशाली सूर्यवंशी,डॉ. वर्षा पाटील डॉ.राजेंद्र तातेड,महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारीप्रा.दत्तात्रय पाळंदे,प्रा.व्यवहारे डॉ निलेश घुगे , प्रा. रामराजे व विद्यार्थी सचिव पूजा जाधव विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले. प्रा..पूनम देसाई यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य डॉ.नितीन जैन यांनी आभार मानले.
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 15:01 IST