भोसला महाविद्यालयात रंगला पदवीग्रहण सोहळा
By Admin | Updated: February 15, 2017 00:33 IST2017-02-15T00:33:12+5:302017-02-15T00:33:54+5:30
भोसला महाविद्यालयात रंगला पदवीग्रहण सोहळा

भोसला महाविद्यालयात रंगला पदवीग्रहण सोहळा
नाशिक : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ व भोसला सैनिकी महाविद्यालयातर्फे पदवीग्रहण सोहळ्यात १८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यालयात आयोजित दुसऱ्या पदवीग्रहण सोहळ्यात संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पाठक यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेचे सहकार्यावाह पी.जी. कुलकर्णी प्राचार्य डॉ. एस. एच. कोचरगावकर, डॉ. यू. वाय. कुलकर्णी, डॉ. व्ही. व्ही. राजे. डॉ. पी. ए. घोष, डॉ. पी. पी. सेठी उपस्थित होते. प्रकाश पाठक यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदवीसमवेत अन्य कौशल्यही आत्मसात करण्याचे आवाहन केले. दरम्यान, महाविद्याल्याच्या घोषपथकासह निघालेल्या मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. (प्रतिनिधी)