शासकीय संगणक टायपिंग परीक्षेसाठी ग्रेस गुण

By Admin | Updated: April 4, 2017 01:24 IST2017-04-04T01:24:10+5:302017-04-04T01:24:24+5:30

दिंडोरी : शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी (जीसीसी-टीबीसी) २+२ असे ४ ग्रेस गुणांची तरतूद केल्याचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढल्याने परीक्षेचा निकाल वाढणार आहे.

Grace properties for government computer typing test | शासकीय संगणक टायपिंग परीक्षेसाठी ग्रेस गुण

शासकीय संगणक टायपिंग परीक्षेसाठी ग्रेस गुण

 दिंडोरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी (जीसीसी-टीबीसी) २+२ असे ४ ग्रेस गुणांची तरतूद केल्याचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढल्याने परीक्षेचा निकाल वाढणार असून, विद्यार्थी व संस्था-चालकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.
शासनाच्या ३१ आॅक्टोबर २०१३ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे संलग्न असलेल्या शासन मान्यता प्राप्त वाणिज्य शिक्षण संस्थामध्ये संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सदर अभ्यासक्रमाच्या गुणदान योजनेमध्ये ग्रेस गुणांची तरतूद केलेली नव्हती. मात्र परीक्षा परिषदेच्याच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेच्या विभाग १ मध्ये ५ ग्रेस गुणांची तरतूद आहे. मागील वर्षी एप्रिल २०१६ मध्ये प्रथमच शासकीय संगणक टायपिंग परीक्षेच्या इंग्रजी, हिंदी, मराठी ३० शब्द प्रतिमिनिट या विषयांची परीक्षा झाली होती. मात्र या परीक्षेचा निकाल खूपच कमी लागाला होता. यानंतर राज्यातील विविध संस्था व संघटनांनी वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेप्रमाणेच संगणक टायपिंग परीक्षेसही ग्रेस गुण देण्याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने सकारात्मक निर्णय घेत २८ आॅक्टोबर २०१६ च्या पत्रान्वये जीसीसी टीबीसी ३० शप्रमी ग्रेस गुणांची तरतूद केलेली आहे. याचनुसार शासकीय संगणक टायपिंग प्रमामपत्र (जीसीसी-टीबीसी) ४० शब्द प्रतिमिनीट व स्पेशल कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर अ‍ॅन्ड स्टुडंट (जीसीसी-एसएसडी-सीटीसी) या परीक्षेसाठी ग्रेस गुणांची तरतूद करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य टंकलेखन, लघुलेखन शासनमान्यता संस्थांची संघटना, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केली होती.

Web Title: Grace properties for government computer typing test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.