चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:50 AM2018-05-16T00:50:41+5:302018-05-16T00:50:41+5:30

नांदूरशिंगोटे : नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरून विकणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांना यश मिळाले आहे. वावी पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून, एका अल्पवयीन मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या दुचाकी खरेदी करणाºया पाच जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Grab five stolen theft | चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

Next
ठळक मुद्देपाच जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले चार दुचाकी चास गावात विकल्या असल्याची माहिती

नांदूरशिंगोटे : नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरून विकणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांना यश मिळाले आहे. वावी पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून, एका अल्पवयीन मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या दुचाकी खरेदी करणाºया पाच जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी वाढत्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात गस्त घालण्यास प्रभारी अधिकाºयांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजित आंधळे यांच्या नेतृत्वाखाली वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरू करण्यात आली आहे. गस्त सुरू असताना चास येथील संशयित अफरोज राजू सय्यद (१६) या अल्पवयीन मुलाच्या ताब्यात चोरीला गेलेली शाईन मोटारसायकल (क्र. एमएच १५ सीवाय ०३४७) मिळून आली. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आणखी चार दुचाकी चास गावात विकल्या असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्याआधारे पोलिसांनी चास गावात अधिक तपास केल्यानंतर दोन होण्डा शाईन, दोन बजाज प्लॅटिना व एक बजाज डिस्कव्हर अशा पाच चोरीच्या मोटारसायकल मिळून आल्या आहेत.

Web Title: Grab five stolen theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा