गोविंदनगर, पाथर्डीतील अतिक्रमणांवर हातोडा

By Admin | Updated: April 6, 2016 00:14 IST2016-04-05T23:34:27+5:302016-04-06T00:14:54+5:30

मनपाची कारवाई : अनधिकृत पक्के बांधकाम तोडले

Govindnagar, Hathoda on encroachment in Pathardi | गोविंदनगर, पाथर्डीतील अतिक्रमणांवर हातोडा

गोविंदनगर, पाथर्डीतील अतिक्रमणांवर हातोडा

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी गोविंदनगर, तसेच पाथर्डी गावातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. यावेळी पक्के बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिडको भागातील गोविंदनगर परिसरातील कृष्णकुंज सोसायटीतील अनधिकृत बांधकाम हटविले. तसेच पाथर्डी गावातील ५ अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालविण्यात आला. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची तीन पथके कार्यरत होती, तर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. सिडको विभागातील अतिक्रमण विभागाचे अधीक्षक बी. वाय. शिंगाडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेने अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटिसा बजविल्यानंतर ज्यांनी बांधकाम काढून घेतले नाही अशा अतिक्रमणधारकांवर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. इंदिरानगर, सिडकोत अतिक्रमणाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.

Web Title: Govindnagar, Hathoda on encroachment in Pathardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.