राज्यपाल राव यांनी घेतले कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वराचे दर्शन
By Admin | Updated: September 4, 2015 22:11 IST2015-09-04T22:10:47+5:302015-09-04T22:11:25+5:30
राज्यपाल राव यांनी घेतले कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वराचे दर्शन

राज्यपाल राव यांनी घेतले कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वराचे दर्शन
.त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजता सपत्नीक त्र्यंबकेश्वराचे दर्शद घेतले.
प्रारंभी कुशावर्त तीर्थ येथे गंगेचे पूजन केले व मंदिरात भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.
गाभाऱ्यात पुरोहितांनी त्यांच्याकडून पूजा करवून घेतली. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजशिष्टाचार अधिकारी सचिन टोंगे व उल्हास आराधी, रंगनाथ आराधी व इतर पुरोहितांनी पौराहित्य केले.
त्र्यंबकराजाच्या दर्शनानंतर राज्यपालांचा ताफा मुंढेगाव (इगतपुरी) येथील कार्यक्रमासाठी रवाना झाला. त्र्यंबकभेटीपूर्वी ब्रह्मा व्हॅली येथील १०८ कुंडी यज्ञाला ते भेट देणार होते. मात्र तेथील भेट वेळेवर रद्द करून त्यांचा ताफा त्र्यंबकला दाखल झाला. (वार्ताहर)