राज्यपाल रमेश बैस यांचे नाशिक मध्ये स्वागत; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार

By संजय पाठक | Updated: October 12, 2023 11:56 IST2023-10-12T11:56:07+5:302023-10-12T11:56:16+5:30

राज्यपाल रमेश बैस  आज नाशिकच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचे नाशिक मध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मान्यवरांनी स्वागत केले.

Governor Ramesh Bais received in Nashik | राज्यपाल रमेश बैस यांचे नाशिक मध्ये स्वागत; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार

राज्यपाल रमेश बैस यांचे नाशिक मध्ये स्वागत; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार

संजय पाठक

नाशिक- राज्यपाल रमेश बैस  आज नाशिकच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचे नाशिक मध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मान्यवरांनी स्वागत केले.  नाशिक शहरातील पंचवटीतील किशोर सूर्यवंशी स्कूलच्या प्रांगणातील हेलिपॅडवर राज्यपालांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्यासह मान्यवर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यानंतर राज्यपाल महाराष्ट्र आरोग्य विद्यालय दाखल झाले. तेथे त्यांचे स्वागत विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी केले. या विद्यापीठात ते बैठक घेणार असून त्यानंतर दुपारी दीड वाजता गंगापूर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास भेट देतील या ठिकाणी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतानाच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

Web Title: Governor Ramesh Bais received in Nashik