शासकीय मुद्रांक विक्र ेत्यांचे कामकाज प्रशासकीय इमारतीत

By Admin | Updated: December 26, 2016 01:36 IST2016-12-26T01:36:08+5:302016-12-26T01:36:24+5:30

शासकीय मुद्रांक विक्र ेत्यांचे कामकाज प्रशासकीय इमारतीत

Government stamp vendors work in the administrative building | शासकीय मुद्रांक विक्र ेत्यांचे कामकाज प्रशासकीय इमारतीत

शासकीय मुद्रांक विक्र ेत्यांचे कामकाज प्रशासकीय इमारतीत

कळवण : जुन्या तहसीलदार कार्यालयात गेल्या आठ महिन्यांपासून कार्यरत असणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांना महसूल प्रशासनाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मुद्रांक विक्रीसाठी जागा दिल्यानंतर मुद्रांक विक्र ेते सोमवारी प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होणार आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर जनतेच्या अडचणी सोडविण्यात महसूल प्रशासनाला यश आले आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून कळवण शहरातील सर्व शासकीय कार्यालय मानूर (कोल्हापूर फाटा) येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत परंतु जागेअभावी शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेते (स्टँप वेंडर) आतापर्यंत जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातच बसून कामकाज करीत होते. त्यामुळे कळवण तालुक्यातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. नागरिकांना स्टँप, कोर्ट फी तिकीट घेण्यासाठी आणि मुद्रांक विक्रेत्यांशी संबंधित कामासाठी जुन्या तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते.
सोमवार (दि. २६) पासून कळवण शहरातील जुन्या तहसील कार्यालयातील सर्व शासकीय मुद्रांक विक्रते (स्टँप वेंडर) कोल्हापूरफाटा येथील नवीन प्रशासकीय कार्यालयातील आवारात स्थंलातरित झाले आहेत. तरी यापुढे तालुक्यातील सर्व नागरिकांनी, मुद्रांक खरेदी-विक्र ी, प्रतिज्ञापत्र, विविध दस्तावेज बनविण्याठी तसेच स्टँप वेंडरशी संबंधित सर्व कामकाजासाठी नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातील दक्षिणेस असलेल्या नवीन स्टँप वेंडर कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन कळवण तालुका शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्र ेते व दस्तलेखक संघटनेचे जिल्हा सचिव डी. एम. गायकवाड यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
(वार्ताहर)

Web Title: Government stamp vendors work in the administrative building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.