शासनाने उपाययोजना करावी
By Admin | Updated: September 5, 2015 21:57 IST2015-09-05T21:56:53+5:302015-09-05T21:57:46+5:30
रासपचे निवेदन : जनावरांसाठी चारा डेपोची मागणी

शासनाने उपाययोजना करावी
सिन्नर : तालुक्यात सलग पाचव्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
सिन्नर तालुक्यात यावर्षी पावसाची सरासरी केवळ ३५ टक्क्यांपर्यंत राहिली आहे. कोणत्याही नदी, नाल्याला पाणी वाहत नसल्याचे चित्र आहे. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे शासनाने चारा डेपो सुरूकरण्याची मागणी निवेदनात केली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरच्या खेपा वाढविण्यासह नवीन टॅँकर वाढविण्यात यावे, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना वीजबिल व कर्जमाफी करण्यात यावी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आदि विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
यावेळी रासपाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांदळकर, तालुकाध्यक्ष नीलेश जगताप, शंकर उबाळे, संदीप बोंबले, दत्तू सैंद, शरद सानप, नामदेव सांगळे, ज्ञानेश्वर सांगळे, सचिन कापडणे, अरुण सोनवणे, योगेश जगताप, खंडू बोडके, संगीता सगर, उज्वला कोरे, ज्योती
लहामगे, शरद उबाळे, संजोग
नाईक, बाळासाहेब कोऱ्हळकर, श्रीकांत नाईक, उत्तम सैंदर
आदिंसह रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)