शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

औद्योगिक कर्जवसुलीसाठी सरकारने मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:59 IST

सरकारने मोठ्या औद्योगिक कर्जदारांना कोणत्याही प्रकारे माफी अथवा तत्सम योजना देऊन सवलत न देता याउलट औद्योगिक कर्जांच्या वसुलीसाठी सरकारने बँकांना मदत करण्याची गरज असल्याचा सूर बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या (बोमो)च्या १९व्या त्रैवार्षिक अधिवेशनात उमटला.

ठळक मुद्देआॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोपराष्ट्रीयीकृत बँकच्या खासगीकरणाला विरोध

नाशिक : सरकारने मोठ्या औद्योगिक कर्जदारांना कोणत्याही प्रकारे माफी अथवा तत्सम योजना देऊन सवलत न देता याउलट औद्योगिक कर्जांच्या वसुलीसाठी सरकारने बँकांना मदत करण्याची गरज असल्याचा सूर बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या (बोमो)च्या १९व्या त्रैवार्षिक अधिवेशनात उमटला. गंगापूररोड परिसरातील एका मंगल कार्यालयात बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा रविवारी (दि. २७) समारोप झाला. या समारोप सोहळ्यात बँक आॅफ महाराष्ट्रचे भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्मा रेड्डी, सुधाकर कुलकर्णी, बाळासाहेब फडणवीस आदी मान्यवरांनी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या अधिवेशनातून सरकारच्या बँकिंग धोरणाविषयी नाराजी व्यक्त करताना अधिकाºयांनी राष्ट्रीयीकृत बँक ांच्या खासगीकरणाला विरोध दर्शवला. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण व एकत्रीकरणाच्या नावाखाली खच्चीकरण केले जात असल्याचा आरोपही या अधिवेशनातून करण्यात आला. दरम्यान, बँकेच्या कारभारात अधिक पारदर्शकता गतिमानता आणण्यासोबतच कार्यक्षम ग्राहकसेवा देऊन अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी बँक अधिकाºयांनी तत्पर सेवा देण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित अधिकाºयांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे शाखा व प्रादेशिक कार्यालयांमध्ये सक्षम कार्यशैलीने अधिकाधिक लक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही काही बँक अधिकायांनी मांडले.अधिवेशनातील ठरावबँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी पाठपुरवा करणे, बँकांचे एकत्रीकरण व खासगीकरणाला विरोध करणे, सध्या नाममात्र करण्यात आलेल्या २ टक्के वेतनवाढीच्या निषेधाचा ठरावही यावेळी करण्यात आला. या प्रश्नांवर दि. ३० व ३१ मे रोजी ४८ तासांचा देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला असून, या संपात संघटनेच्या सर्व सदस्यांनी सहभागी होण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला.मध्यवर्ती संघटनेची कार्यकारिणी जाहीरबँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या अधिवेशनात संघटनेची मध्यवर्ती कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारिणीत नाशिकमधून सदाशिव पाटील, आधार बाविस्कर व सचिन कडलग यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील देशपांडे यांची पुन्हा निवड झाली असून, कार्यकारी अध्यक्षपदी विराज टिकेकर व अश्विनी देव व महासचिवपदी संतोष गदादे यांची निवड झाली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र