शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार : आव्हाड
By Admin | Updated: June 1, 2014 00:54 IST2014-05-31T21:42:53+5:302014-06-01T00:54:01+5:30
नाशिक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही़ त्यामुळे सर्वप्रथम ही पदे भरली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मंजूर पदांबाबत बैठक घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़ मंत्रिपदाच्या अल्प कालावधीत अधिक कामे करण्याकडे आपला कल असल्याचे आव्हाड यांनी सांगितले़

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार : आव्हाड
नाशिक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही़ त्यामुळे सर्वप्रथम ही पदे भरली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मंजूर पदांबाबत बैठक घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़ मंत्रिपदाच्या अल्प कालावधीत अधिक कामे करण्याकडे आपला कल असल्याचे आव्हाड यांनी सांगितले़
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १३ दीक्षान्त समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड यांनी वेगवेगळ्या विषयांना हात घातला़ सर्वप्रथम त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांबाबत निर्णय घेतल्याचे सांगितले़ मंत्रालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्राध्यापकांची ८०० पदे त्यात ४०० पदे पदोन्नतीने, १५०० नर्सेस याबरोबरच टेक्निशिअन आदि पदे येत्या ६० दिवसांमध्ये भरण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले़
वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांना शिकविणारे प्राध्यापक यांच्यावरील ताण पाहता कुलगुरूंशी बोलून स्ट्रेस मॅनेजमेंटबाबत काही उपक्रम राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल़ खेड्यातील मुलांचा वैद्यकीय शिक्षणाकडे कल कसा वाढेल याविषयी येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रालयात बैठक घेतली जाणार असल्याचेही आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले़ (प्रतिनिधी)
सिनेट सदस्यपदी महिलांना पन्नास टक्के आरक्षण
मध्य प्रदेश वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ डी़पी़ लोकवाणी यांनी दीक्षान्त समारंभात, मुलींनी सर्वाधिक ४७ पैकी ३२ गोल्ड मेडल पटकावल्याचे सांगितले़ मात्र एकही सिनेट सदस्यपदी महिला नसल्याची खंत व्यक्त केली़ यानंतर आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले़