शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची ‘लॅपटॉप’ खरेदी वादाच्या भोव-यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:01 IST

खुल्या बाजारात ४० हजारापर्यंत मिळणारे अत्याधुनिक लॅपटॉप राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ६२ हजार रूपयांना खरेदी केले

ठळक मुद्देजादा दर : विरोधीपक्ष नेत्याने माहिती मागविली माहिती व तंत्रज्ञान विभागाने ६२ हजार रूपयांना खरेदी केले

नाशिक : संगणकीय सातबारा उता-याचे काम करण्यासाठी शासनाने जादा दराने खरेदी केलेले ‘लॅपटॉप’ वादाच्या भोव-यात सापडले असून, खुल्या बाजारात ४० हजारापर्यंत मिळणारे अत्याधुनिक लॅपटॉप राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ६२ हजार रूपयांना खरेदी केल्याची तक्रार राज्यभरातून होऊ लागताच विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिका-यांकडून या खरेदी संदर्भातील कागदपत्रे तातडीने मागविली आहेत.संगणकीय सातबारा, आॅनलाइन फेरफार यांसह तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या अखत्यारितील तत्सम कामासाठी शासनाच्या वतीने लॅपटॉप देण्याचे ठरविण्यात आले होते. राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने या संदर्भातील तांत्रिक बाबी पाहून खरेदी करावी, असेही ठरले होते व त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने आपल्याकडील तलाठी व मंडळ अधिका-यांची संख्या पाहून शासनाला कळविले होते. वर्षभरापूर्वी नाश्कि जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ४९२ तलाठी व ९२ मंडळ अधिका-यांची संख्या गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने खुल्या बाजारात चांगल्या कंपनीचे मिळणारे लॅपटॉपचे दर पाहता साधारणत: अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. लॅपटॉपच्या या खर्चात तितकेच प्रिंटरही घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.तलाठ्यांना लॅपटॉप देण्यासाठी येणाºया खर्चाची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून भागविण्यात आला व साधारणत: वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला अडीच कोटी रुपये वर्ग केले, तेव्हापासून जिल्ह्याला लॅपटॉपची प्रतीक्षा होती. राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने लॅपटॉप खरेदीसाठी राज्यपातळीवर निविदा मागविल्या असता त्यातील कमी दर ‘कॉमनेट सोल्युशन प्रा. लि.’ या अंधेरी पूर्व, मुंबई या कंपनीने भरल्यामुळे या कंपनीकडून ‘डेल’ या नामांकित कंपनीचे लॅपटॉपची संपूर्ण राज्यासाठी ४२७५ इतके नग खरेदी करण्यात आले आहेत, एका लॅपटॉपची किंमत ६१ हजार २५७ रुपये इतकी लावण्यात आली असून, नाशिक जिल्ह्याने पाठविलेल्या अडीच कोटी रुपयांत जेमतेम निम्मेच म्हणजे ३५५ इतकेच लॅपटॉप खरेदी करता आल्याने दोन दिवसांपूर्वी ते नाशिकला पाठविण्यात आले होते. परंतु खुल्या बाजारात त्याचे दर अवघे ४० ते ४५ हजार रूपये इतके असताना शासनाने जादा दराने खरेदी करण्यामागे संशय व्यक्त केला जात होता. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविली आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयNashikनाशिक