शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 20:01 IST2019-09-14T19:58:08+5:302019-09-14T20:01:04+5:30
नायगाव : शासनाने शेतकऱ्यांची २०१९ पर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा ठराव पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) विविध कार्यकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण ...

निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथिल विविध कार्यकारी संस्थेच्या सभासदांना मार्गदर्शन करतांना डॉ. रघुनाथ बोडके समवेत संस्थेचे सभासद.
नायगाव : शासनाने शेतकऱ्यांची २०१९ पर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा ठराव पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) विविध कार्यकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. आर. बोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत व्यवस्थापक चिंतामण लोखंडे यांनी इतिवृत्त वाचन केले. यावेळी संस्थेचे कर्जदार सभासद थकबाकीत गेलेले कर्ज भरत नाही. त्यामुळे संस्थेला नियमित कर्जदारास कर्जपुरवठा करण्यास अडचणी येत असल्याचे बोडके यांनी सांगितले.
यावेळी शासनाने थकबाकी असलेल्या शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा ठराव मांडण्यात आला असता सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते मंजूरी दिली. तसेचआगामी आर्थिक आराखड्यास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.