शासकीय कर्मचाऱ्यांची फुल टू धम्माल!

By Admin | Updated: October 27, 2014 00:12 IST2014-10-27T00:10:15+5:302014-10-27T00:12:56+5:30

नोव्हेंबरचा पहिला आठवडा दिवसाआड सुट्यांचा

Government employees' full-to-the-moment! | शासकीय कर्मचाऱ्यांची फुल टू धम्माल!

शासकीय कर्मचाऱ्यांची फुल टू धम्माल!

नाशिक : दिवाळीच्या सुट्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फुल टू धम्माल असाच आहे़ याचे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना या पहिल्या आठवड्यात केवळ तीनच दिवस कामावर जावे लागणार आह़े
शासकीय कर्मचाऱ्यांना १ ते ९ नोव्हेंबरपर्यंत एक दिवसाआड सुटी मिळणार आहे़ १ तारखेला शनिवार असून २ तारखेला रविवारची सुटी आहे़ सोमवारी कामावर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी लगेचच मोहरम (ताजिया) निमित्तची सुटी आहे़ बुधवारी एक दिवसाच्या कामानंतर गुरुवारी गुरू नानकदेव यांच्या जयंतीनिमित्त सुटी आहे़ शुक्रवारी कामावर गेल्यानंतर शनिवारी महिन्याचा दुसरा शनिवार व त्यानंतरचा रविवार अशी दोन दिवस सलग सुटी मिळणार आहे़
शासकीय कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामानंतर मिळालेल्या दिवाळीच्या सुट्या, त्यानंतर सहा दिवस विनासुटी काम केल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवसाआड सुट्या मिळणार असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये फु ल टू धम्माल आहे़ यामध्ये काहींनी तर तीन दिवसांच्या सुट्या टाकून आठवडाभर सुट्या घेण्याचेही नियोजन सुरू केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Government employees' full-to-the-moment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.