शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

शासकीय खर्चाने राजकीय प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:29 IST

पिंपळगाव बसवंत येथे पहिल्यांदाच निवडणूक प्रचारार्थ येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या यशस्वीतेसाठी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रम कारणी लागत असून, सभास्थळी करण्यात येत असलेल्या सोयी, सुविधा तसेच तांत्रिक कामांसाठी सरकारी खर्च केला जात असल्याने शासकीय खर्चात राजकीय प्रचार होत असल्याची टीका केली जात आहे.

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथे पहिल्यांदाच निवडणूक प्रचारार्थ येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या यशस्वीतेसाठी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रम कारणी लागत असून, सभास्थळी करण्यात येत असलेल्या सोयी, सुविधा तसेच तांत्रिक कामांसाठी सरकारी खर्च केला जात असल्याने शासकीय खर्चात राजकीय प्रचार होत असल्याची टीका केली जात आहे.निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारासाठी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी एकच आचारसंहिता लागू केली असली तरी, त्यातून पंतप्रधान या पदाला मात्र वगळण्यात आले आहे. त्यामागे पंतप्रधान या पदाचा असलेला मान व त्यांची सुरक्षितता ही कारणे देण्यात आली आहेत. त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने नियोजनाचे सारे काम शासकीय यंत्रणेवर सोपविण्यात आले आहे. जाहीर सभेसाठी व्यासपीठ, ध्वनिक्षेपक, बॅरिकेडिंग, मंडप उभारणी, श्रोत्यांची ने-आण करण्याचा खर्च राजकीय पक्ष करणार असला तरी, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ओझरहून हेलिकॉप्टरने पिंपळगावी येणार असल्याने त्यांच्या चार हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड उभारून देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात आले आहे. हेलिपॅडसाठीच्या जागेची निवड, त्याची साफसफाई, गेल्या तीन ते चार दिवसांपासून जमिनीवर टॅँकरद्वारे पाणी मारून बांधकाम खात्याने हेलिपॅड उभारले आहे.सभास्थळी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्याबरोबरच हॉटलाइन, ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा दूरसंचार विभागाने पुरविली आहे. वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी वीज मंडळ प्रयत्नशील आहे. सभास्थळी चोख व्यवस्था, त्याचबरोबर ओझर विमानतळावर चहा-पाण्याची सोय करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर असून, गेल्या तीन दिवसांपासून निफाडचे प्रांत यासाठी प्रयत्नशील आहेत.सभास्थळी मिनी ‘पीएमओ’मोदी यांच्या सभेसाठी येणाºया शासकीय दूरदर्शन, रेडिओच्या प्रसारणाची व्यवस्थादेखील शासकीय खर्चाने करण्यात येत असून, सभास्थळी मिनी ‘पीएमओ’ कार्यालय उभारण्यात येणार असल्याने याठिकाणी सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी संगणक, प्रिंटर हे आयोजकांनी पुरविले असले तरी, त्याची हाताळणी व ताबा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे अधिकारी आपल्या कर्मचाºयांसह सभास्थळी तळ ठोकून आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार