शासन हमीभावाने तूर खरेदीस प्रारंभ

By Admin | Updated: February 5, 2017 00:02 IST2017-02-05T00:02:17+5:302017-02-05T00:02:31+5:30

येवला : ५०५० रुपये क्विंटल स्थिर भाव

Governance guarantees to start buff bag | शासन हमीभावाने तूर खरेदीस प्रारंभ

शासन हमीभावाने तूर खरेदीस प्रारंभ

येवला : नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने येवला तालुका सहकारी खरेदी-विक्र ी संघात ५०५० रुपये प्रतिक्विंटल स्थिर भावाने तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी आपली तूर स्वच्छ करून वाळवून तसेच सोबत सातबारा उतारा, आधार कार्ड व बॅँक पासबुक झेरॉक्स आणण्याचे आवाहन सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके व जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंके यांनी केले. तूर खरेदीसाठी आलेल्या पहिल्या गोणीला हार घालून खरेदीची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव डी.सी. खैरनार यांनी केले. यावेळी खरेदी-विक्र ी संघाचे चेअरमन राजेंद्र गायकवाड, व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी खरेदी केल्या जाणाऱ्या तुरीबाबतचे निकष शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन भास्कर येवले, संचालक  दगडू टर्ले आदिंसह शेतकरी उपस्थित होते.  यंदा पुरेसा पाऊस आणि अनुकूल हवामान असल्याने तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने तुरीचे भाव कोसळले होते. शासनाने ५०५० रुपये हमीभाव जाहीर करूनदेखील कमी दराने तूर विकावी लागल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या वर्षी कमी उत्पादन असल्याने पहिल्या टप्प्यात १३ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने तूर विकली गेली. त्यांनतर ९५०० रु पयांपर्यंत तुरीचे भाव स्थिर झाले होते. यंदा मात्र खुल्या बाजारपेठेत चार हजार पाचशे रुपयापर्यंत तुरीचे भाव कोसळले. गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीला निम्म्यापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाला आहे. यावर मलमपट्टी म्हणून फेअर अ‍ॅव्हरेज क्वॉलिटीच्या नियमानुसार १२ टक्के आर्द्रता, धान्याचे ग्रेडिंग, कचराविरहित तूर अशा कसोटीतून जाऊन शेतकऱ्यांच्या तुरीला ५०५० रुपये प्रतिक्विंटल भाव पदरात पडणार  आहे. (वार्ताहर)


 

Web Title: Governance guarantees to start buff bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.