गोवर्धनच्या सरपंचपदी खराटे, उपसरपंचपदी वायचळे
By Admin | Updated: July 26, 2016 00:13 IST2016-07-26T00:13:06+5:302016-07-26T00:13:18+5:30
गोवर्धनच्या सरपंचपदी खराटे, उपसरपंचपदी वायचळे

गोवर्धनच्या सरपंचपदी खराटे, उपसरपंचपदी वायचळे
नाशिक : तालुक्यातील गोवर्धन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने १३ पैकी ७ जागेवर विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले.
गोवर्धन ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी शेलळूरकर व ग्रामविकास अधिकारी पांडूरंग ठोके तसेच नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे उपस्थित होते.
सरपंच पदासाठी परिवर्तन पॅनलच्या कल्पना खराटे यांनी सात मते मिळवून माजी सरपंच मीना गभाले यांचा पराभव केला, तर उपसरपंच पदासाठी परिवर्तन पॅनलचे बाळासाहेब वायचळे यांनी सात मते मिळवून अलका जाधव यांचा पराभव केला. यावेळी अनिता गढादरा, नंदू जोंधळे, दत्तू डंबाळे, रंजना बेंडकोळी, रवींद्र मोंढे हे सदस्य म्हणून निवडून आले. नवनिर्वाचितांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिवर्तन पॅनलचे नेते किशोर जाधव, बाळासाहेब पाटील, गोवर्धन राजीव गांधीनगर ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)