गोंदे दुमाला फाट्यावर मद्यसाठा जप्त
By Admin | Updated: July 26, 2016 23:49 IST2016-07-26T23:49:35+5:302016-07-26T23:49:35+5:30
गोंदे दुमाला फाट्यावर मद्यसाठा जप्त

गोंदे दुमाला फाट्यावर मद्यसाठा जप्त
बेलगाव कुऱ्हे : मुंबई-नाशिक महामार्गावरील गोंदे दुमाला फाट्यावर मारु ती इको या वाहनातून देशी व विदेशी दारू वाहून नेणाऱ्या संशयितास वाडीवऱ्हे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
मुंबई नाशिक महामार्गावरून सोमवारी (दि. २५) सायंकाळी साडेसहा वाजता मनोज अर्जुनदास पूरस्वामी (४४, रा. शिवशंकर सोसायटी, पंचवटी) हा मारुती इको (क्र.एमएच १५ इके ३२१५) तून सुमारे एक लाख ४८ हजार ८९२ रुपयांचे देशी-विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक करताना आढळून आला. वाडीवऱ्हे पोलिसांनी त्याला अटक करून वाहन व विक्र ीसाठी नेण्यात येणारे मद्यसाठा ताब्यात घेतला आहे. संशयित पूरस्वामी याच्या विरुध्द वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शाम सोनवणे, फड, परदेशी, क्षीरसागर करीत आहेत. (वार्ताहर)