शुभवर्तमान : मनपा शिक्षण मंडळात नववर्षात संकल्पना राबविण्याची तयारी सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:54 IST2017-12-01T00:54:03+5:302017-12-01T00:54:48+5:30

Gospel: Preparation to implement concept in Navy Shikshan Mandal in New Year, Virtual Classroom | शुभवर्तमान : मनपा शिक्षण मंडळात नववर्षात संकल्पना राबविण्याची तयारी सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूम

शुभवर्तमान : मनपा शिक्षण मंडळात नववर्षात संकल्पना राबविण्याची तयारी सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूम

ठळक मुद्देडिजिटल युगाचा स्वीकार नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले

नाशिक : डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची सवय आता महापालिका शाळांनाही लागली पाहिजे. त्यासाठीच, नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार असून, नववर्षात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे.
डिजिटल युगाचा स्वीकार करण्यात महापालिका शाळाही मागे राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागामार्फत वेगवेगळ्या स्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून मनपा शिक्षण विभागाला ६ व्हर्च्यूअल क्लासरूम मंजूर झाल्या आहेत.
या क्लासरूमचे केंद्र मनपाच्या शाळा क्रमांक ६ मध्ये असणार आहे. शिक्षण विभागाने सहाही विभागातील एका शाळेची त्यासाठी निवड केली आहे. शाळा क्रमांक १६ मधून प्रक्षेपण संबंधित शाळांमध्ये केले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, शैक्षणिक लघुपट, अभ्यासाला पूरक फिल्मस् यांचा समावेश असणार आहे. संबंधित शाळांमध्ये आसपासच्या पालिका शाळांमधील विद्यार्थी निवडून त्यांचे गट करून त्यांना व्हर्च्यूअल क्लासरूमशी कनेक्ट केले जाणार आहेत. ज्या शाळांमध्ये नववी-दहावीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठीही उपयुक्त अशा कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपासनी यांनी दिली. या क्लासरूमच्या माध्यमातून त्या-त्या शाळांमधील शिक्षकांचे उद्बोधन होणार आहे.

Web Title: Gospel: Preparation to implement concept in Navy Shikshan Mandal in New Year, Virtual Classroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :digitalडिजिटल