गोपीनाथ मुंडे यांना जिल्ह्यात श्रद्धांजली

By Admin | Updated: June 10, 2014 01:01 IST2014-06-10T00:46:52+5:302014-06-10T01:01:39+5:30

गोपीनाथ मुंडे यांना जिल्ह्यात श्रद्धांजली

Gopinath Munde's tribute to the district | गोपीनाथ मुंडे यांना जिल्ह्यात श्रद्धांजली

गोपीनाथ मुंडे यांना जिल्ह्यात श्रद्धांजली

 

नाशिक : दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोकसभांचे आयोजन करण्यात आले.
नांदगाव येथील जैन धर्मशाळेत सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. मुंडे यांचे नांदगाव तालुक्यावर विशेष प्रेम होते. त्यांचा दौरा येथील राजकारणाला दिशादर्शक ठरत असे, या भावनांसह त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी बहुतांश वक्त्यांनी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या अ‍ॅड. जयश्री दोंड, कॉँग्रेसचे माजी आमदार अनिल अहेर, राष्ट्रवादीचेमाजी आमदार जगन्नाथ धात्रक, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, मनसेचेअ‍ॅड. हिरालाल गांधी, महेंद्र बोरसे, राजाभाऊ पवार, जयकुमार कासलीवाल, गुलाबराव पालवे, युनूस शेख, रवींद्र परशुरामी, राजेंद्र चौधरी, राजेंद्र दराडे, डॉ. वाय. पी. जाधव, डॉ. सुनील तुसे, बाळासाहेब कवडे, भास्कर कदम आदिंनी श्रध्दांजली अर्पण केली. प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी केले. यावेळी सौ. मंगलाताई भोसले, संजय पटेल, चंद्रकला पाटणी, स्वप्नील शिंदे, प्रमोद दोंड, राजेश कांगणे, कृष्णा त्रिभुवन, गणेश शिंदे, चेतन सुरले आदि उपस्थित होते.
निफाड येथे शोकसभा
निफाड : येथील मार्केट कमिटी हॉलमध्ये सर्वपक्षीय शोकसभा झाली. यावेळी राजाभाऊ शेलार, सुरेशबाबा पाटील, ज्येष्ठ नेते आणि मुंडेंचे निकटवर्तीय प्रल्हाद पाटील कराड यांनी मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण केली. सरपंच अनिल कुंदे, सुभाष कराड, अ‍ॅड. ना.भा. ठाकरे, संपतराव डुंबरे, विक्रम रंधवे, प्राचार्य डॉ. एस.आर. आंधळे, अशोक कापसे, संजय कुंदे, श्याम शिंदे, नंदलाल चोरडिया आदिंनी भावना व्यक्त केल्या.
वणी येथे श्रध्दांजली सभा
वणी : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना संताजी चौकात महायुतीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंडे यांच्या राजकीय जीवन प्रवाहाविषयी डॉ. एम. टी. जैन भाजपा तालुका उपाध्यक्ष महेंद्र पारख, रवि सोनवणे, प्रमोद भांबेरे, संपतराव घडवंजे यांनी श्रद्धांजली अर्पण करून मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली.

Web Title: Gopinath Munde's tribute to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.