गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:16 AM2019-12-22T00:16:10+5:302019-12-22T00:16:56+5:30

श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच अनेक शाळांमध्ये गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 Gopala Gopala Devaki Nandan Gopala ... | गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला...

गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला...

googlenewsNext

नाशिक : श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच अनेक शाळांमध्ये गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इंदिरानगर येथे कनोजिया धोबी समाज संस्थेच्या वतीने संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन नगरसेवक श्याम बडोदे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे जिल्हाध्यक्ष श्याम कनोजिया व परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, विभागाचे अध्यक्ष सोनू कनोजिया, जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, नाना गवळी, माजी पोलीस आयुक्त सुधीर खैरनार उपस्थित होते. याप्रसंगी सुरेश कनोजिया, कृष्णा कानोजिया, सत्यनारायण कनोजिया, नगदू कनोजिया, दर्शन कनोजिया, जवाहर कनोजिया आदी उपस्थित होते.
मराठा हायस्कूलमध्ये भजन सादर
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये संत गाडगेमहाराज यांचा स्मृतिदिन स्वच्छतेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण विद्यालयाची स्वच्छता करण्यात आली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरु ण पवार होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक सुरेश सोमवंशी, पुरु षोत्तम थोरात, रघुनाथ आहेर उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आर्या कुशारे, ध्रुव जाधव, तन्वी घोरपडे यांनी गाडगेमहाराजांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. विवेक शिरसाठ याने एकपात्री एकांकिका गाडगेमहाराजांच्या जीवनावर सादर केली.त्यानंतर विद्यालयाच्या गीतमंचाने संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन सादर केले. सूत्रसंचालन अपेक्षा खैरनार व आरोही बच्छाव यांनी केले.
आडगाव विद्यालयात स्वच्छतेचा संदेश
आडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. उपशिक्षक प्रवीण गावित यांच्या नियोजनाखाली विद्यार्थ्यांनी आडगाव मंदिर परिसर, तलाठी कार्यालय परिसर स्वच्छ केला. स्वच्छता रॅलीसाठी उपशिक्षक जनार्दन धूम, अतुलकुमार माळेकर, अमरसिंग पाडवी, कलाशिक्षक हेमराज नागपुरे यांचे सहकार्य लाभले. यानंतर विद्यालयात बालसभेचे आयोजन करण्यात आले. बालसभेचे अध्यक्ष ऐश्वर्या गोसावी, भाई माळोदे तसेच मुख्याध्यापक मुरलीधर हिंडे, पर्यवेक्षक दिवाकर शेवाळे, गाडगेबाबा वेशभूषेतील विद्यार्थी श्रेयस दीक्षित यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्र म प्रसंगी आदित्य जाधव व अतुल गुंबाडे, पूनम धोंडगे, भक्ती धोत्रे यांनी मनोगतातून गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
नासाका माध्यमिक विद्यालय
नाशिकरोड : नासाका माध्यमिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांचा स्मृतिदिन मुख्याध्यापक शंकर पिंगळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पिंगळे यांनी गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांना आचरणात आणावा, असे सांगितले. गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी दिली. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठा संख्येने उपस्थित होते.
लाखलगाव येथील जिल्हा परिषद शाळा
लाखलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्र माची सुरु वात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दीपाली कांडेकर व शिक्षिका विजया पगार यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्र मास मनीषा कांडेकर, सुवर्णा कांडेकर, मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे, ज्येष्ठ शिक्षक हिरामण बर्डे, विजय जगताप, नीता कदम, शीतल पगार उपस्थित होते.

Web Title:  Gopala Gopala Devaki Nandan Gopala ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.