गरीब रुग्णांसाठी चांगले काम : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:22 AM2018-08-26T01:22:57+5:302018-08-26T01:23:19+5:30

शिवसेना पक्षाचे सूत्र २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण असून, याप्रमाणेच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे काम असून गरीब गरजू रुग्णांसाठी चांगले काम उभे राहिले असल्याचे प्रतिपादन शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.

Good work for poor patients: Aditya Thakre | गरीब रुग्णांसाठी चांगले काम : आदित्य ठाकरे

गरीब रुग्णांसाठी चांगले काम : आदित्य ठाकरे

Next

सिन्नर : शिवसेना पक्षाचे सूत्र २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण असून, याप्रमाणेच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे काम असून गरीब गरजू रुग्णांसाठी चांगले काम उभे राहिले असल्याचे प्रतिपादन शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.  सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेली मेडिसीनच्या उद्घाटन कार्यक्र मात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य वनीता शिंदे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.  युवकांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी झेपेल तोच अभ्यासक्रम निवडावा व आवडत्या क्षेत्रात करीअर करावे. त्यामुळे यशस्वी होण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले.  ग्रामीण भागातील रुग्ण शहरात उपचारासाठी धाव घेतात. त्यांना चांगल्या सुविधा ग्रामीण भागातच उपलब्ध होणे गरजेचे होते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार होण्याची सुविधा निर्माण झाल्याने वेळ, पैसा वाचणार आहे. खऱ्या अर्थाने गरजेची बाब उपलब्ध झाली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. हे काम मार्गी लावल्याबद्दल त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे कौतुक केले.

Web Title: Good work for poor patients: Aditya Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.