शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांसाठी गुड न्यूज; सोमवारी मान्सून देणार जिल्ह्यात सलामी! 

By अझहर शेख | Updated: June 22, 2023 17:06 IST

बिपरजॉय चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वारे कमकुवत केल्यामुळे पाऊस लांबला आहे.

नाशिक : वरुणराजाच्या कृपादृष्टीसाठी सारेच जण प्रार्थना करत असून बळीराजाही पेरणीची तयारी करून सज्ज झाला आहे. वरुणराजा बरसताचा बळीराजा आपल्या सर्जा-राजाच्या साथीने पेरता होणार आहे. येत्या सोमवारी (दि.२६) नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. घाटप्रदेशातील काही गावांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वारे कमकुवत केल्यामुळे पाऊस लांबला आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होणार का अशी चिंता जिल्हा प्रशासनालाही सतावू लागली आहे.हवामान खात्याकडून आलेल्या अंदाजानुसार येत्या सोमवारी जिल्ह्यातील घाटप्रदेशातील तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे. या भागासाठी ‘यलो अलर्ट’ दिला गेला आहे. तसेच रविवारीसुद्धा नाशिकमध्ये पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव होऊ शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सध्या १ हजार ७८२ दलघफू अर्थात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच गंगापूर धरण समूहातसुद्धा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, मात्र हा पाणीसाठा ऑगस्टच्या मध्यान्हपर्यंतच पुरणारा आहे. यामुळे तोपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्यास मोठा दिलासा नाशिककरांना मिळणार आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलस्त्रोतांचा शोध घेण्याचे आदेशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, नगरपालिकांचे अधिकारी, कृषी विभागाचे व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक