गोंदे दुमाल्यात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:29 PM2020-01-13T23:29:38+5:302020-01-14T01:22:33+5:30

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हीटीसी फाट्यानजीक झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली.

Gonds kill one in two | गोंदे दुमाल्यात एक ठार

व्हीटीसी फाट्या जवळील अपघातात झायलो गाडीची झालेली अवस्था.

Next
ठळक मुद्देसहा जखमी : महामार्गावर उभ्या कारवर आदळला टँकर

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हीटीसी फाट्यानजीक झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली.
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हीटीसी फाट्याजवळ नाशिककडे जाणाऱ्या झायलोचे (क्र. एमएच ०२. डब्ल्यूए ७३९३) टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पंक्चर काढण्याचे काम सुरू केले. तेव्हा नाशिकच्या दिशेने जाणाºया भरधाव कंटेनरने (क्र . एमएच ४३ बीपी १४८५) झायलो कारला मागून जोरदार धडक दिल्याने
झालेल्या अपघातात झायलोचा चालक राजभार झब्बार (२८, कांदिवली, मुंबई) हा जागीच ठार झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती गस्त घालत असलेल्या वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी सदर अपघाताची माहिती वाडिवºहे पोलीस स्टेशनला कळविले. यानंतर लगेचच गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड पाटील यांना अपघाताची माहिती मिळताच तातडीने अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाडीवºहे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.

अपघातातील जखमींची नावे
चंद्रशेखर लालधारी यादव.
(३३, जोगेश्वरी, मुंबई), सुमनकुमार धनंजय झा
(२४, बोईसर, मुंबई), धर्मेंद्रकुमार रामाशंकर गोळ
(३०, कांदिवली, मुंबई), पिंटू ओमप्रकाश सिंग
(२५, कांदिवली, मुंबई), ललितकुमार शिवप्रसाद पाल (वय २८), तर अन्य एकाचे नाव समजू शकले नाही, असे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Web Title: Gonds kill one in two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात