गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:21 IST2020-02-22T23:21:35+5:302020-02-23T00:21:35+5:30
सिन्नर : येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. मिरवणुकीत शंकर पार्वती, अर्ध नारीनटेश्वर, रावण, ...

सिन्नर येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री गोंदेश्वर महाराजांच्या मुखवट्याची पालखी काढण्यात आली. त्यात विविध वेशभूषा करून सहभागी झालेले भाविक.
सिन्नर : येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. मिरवणुकीत शंकर पार्वती, अर्ध नारीनटेश्वर, रावण, शुंभ, नांदी, भूत अशा विविध वेशभूषा, घेडे, बग्गी, वाजंत्री पथक, कच्छी ढोल पथक सहभागी होते. सदर प्रदक्षिणा महालक्ष्मी रोडवरून गोंदेश्वर मंदिराचे गुरव यांच्याघरून निघाली. महालक्ष्मी रोड, कमिटी कॉर्नर, खडकपुरा, गंगावेस, लालचौक, शिंपी गल्ली, गणेशपेठ, छत्रपती शिवाजी चौक, वावी वेस, नवीन कोर्टमार्गे गोंदेश्वर मंदिरात पोहोचली. प्रदक्षिणा मार्गात नागरिकांनी सडा रांगोळी करून पालखीचे स्वागत केले. पालखीसमोर रु द्र वाद्य पथकाचे कच्छी ढोल वाद्य पथक होते. गोंदेश्वर मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात प्रसादाचे वाटप करण्यात आले. उत्सव यशस्वीतेसाठी श्री गोंदेश्वर सेवा संघ, युवा फाउण्डेशन, रु द्र वाद्य पथक यांनी परिश्रम घेतले.