येवला येथे गोमांसाचा ट्रक जप्त

By Admin | Updated: April 2, 2016 23:42 IST2016-04-02T23:20:57+5:302016-04-02T23:42:19+5:30

कारवाई : पाच जणांना अटक

Gomansaha truck seized at Yeola | येवला येथे गोमांसाचा ट्रक जप्त

येवला येथे गोमांसाचा ट्रक जप्त

 येवला : कोपरगाव रोडवर गोमांस असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर सदर ट्रक अडवून येवला पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक ताब्यात घेत पाच जणांना अटक केली आहे.
कोपरगाव - येवला रोडवर काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी येवला शहर पोलिसांशी संपर्क साधत सोलापूर येथून गोमांस भरून ट्रक (क्र. एमएच १८ बीए ००७६) मालेगावकडे जात असताना शहर पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी अभिमन्यू अहेर, भाऊसाहेब टिळे, महाजन यांच्यासह नागरिकांनी शुक्र वारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येवला शहराजवळ तहसील कार्यालयासमोर सदर ट्रक अडविला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात पाच टन दुर्गंधीयुक्त मांस व हाडे आढळून आल्याने पोलिसांनी सय्यद जावेद सय्यद निसार, आरिफ महंमद गुफरान, शेख पप्पू शेख अशरफ, अली अश्पाक व ट्रक मालक सर्व रा. मालेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन सुमारे सव्वाआठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर येवला शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६चे कलम ६, ७, ९ व गोवंश कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Gomansaha truck seized at Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.