भरदिवसा लांबवली सोन्याची पोत

By Admin | Updated: June 26, 2014 01:02 IST2014-06-26T00:55:30+5:302014-06-26T01:02:32+5:30

भरदिवसा लांबवली सोन्याची पोत

Gold Vendor Shutdown | भरदिवसा लांबवली सोन्याची पोत

भरदिवसा लांबवली सोन्याची पोत

 

नाशिकरोड : अशोका मार्ग येथे दुकान मालकिणीच्या गळ्यातून दोघा भामट्यांनी १८ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओढून चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कल्पतरूनगरमध्ये वसंतकुंज इमारतीत राजसारथी किराणा स्टोअर्स आहे. दुकान मालकीण गजनी काशीनाथ कापुरे (वय ५५) या मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे दुकानात बसलेल्या असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी त्यांच्याकडून चार सिगारेट खरेदी केल्या. या दोघा भामट्यांनी पुन्हा ‘ते’ दाखवा असे म्हटल्याने गजनी कापुरे यांनी आपल्या मागील बाजुचे काय मागता आहेत ते बघण्यासाठी वळाल्या.
यावेळी त्या भामट्यांनी क्षणाचाही विलंब न करता गजनी कापुरे यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची पॅन्डल असलेली १८ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओढून चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Gold Vendor Shutdown