चांदवड : येथील संजना मनोज गुजराथी हिने ४० किलो वजनीगटात राष्टÑीय थाईबॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. भोपाळ येथील टीआयटी सायन्स कॉलेज, आनंदनगर येथे झालेल्या चौथ्या राष्टÑीय थाईबॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेत भाग घेत १३ वर्षीय संजना हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हे यश मिळविले. संजना ही नाशिक जिल्हा तालीम संघाचे सचिव बाळासाहेब गुजराथी यांची नात आहे. तिचा मध्य प्रदेश कुंग-फू असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिला मनोज कछावा यांंचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
चांदवडच्या संजना गुजराथीला राष्टÑीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:44 IST