शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:37 PM2020-10-11T22:37:58+5:302020-10-12T01:15:39+5:30

नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या दोन्ही परिमंडळांमधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने महिला वर्गांमध्ये पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Gold chain thieves continue to rage in the city | शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच

शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी तीन महिलांचे मंगळसूत्र लंपास

नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या दोन्ही परिमंडळांमधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने महिला वर्गांमध्ये पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इंदिरानगर, म्हसरूळ, आडगाव या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तीन पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोलिसांना पुन्हा खुले आव्हान दिले आहे. वारंवार राजरोसपणे घडणा?्या चेंनस्नचिंगच्या घटनांमुळे आता पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सोनसाखळी चोराने म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारच्या दुचाकीचा वापर न करता पायी चालत एक महिलेच्या समोरून येत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली. ही घटना शनिवारी (दि.10) संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पेठरोडवरील न्यू हिरा हॉटेलसमोर घडली. फिर्यादी मुक्ता बादशाह घोटेकर(52, रा.शिवतेजनगर) या संध्याकाळी भाजीपाला खरेदी करुन पायी जात असताना वडाच्या झाडाजवळ त्यांच्या समोरुन आर टी ओ आॅफिस च्या दिशेने चालत एक पादचारी इसम आला व त्याने जवळ येताच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून सप्तरंग सोसायटीच्या बाजूने पळ काढला. या जबरी चोरीत चोरट्याने सुमारे 80 हजार रुपये किंमतीचे 25ग्रॅमचे मंगळसूत्र लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात चोरट्याने कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा वापर केल्याचे दिसून आले नाही, बहुदा अशा पद्धतीने सोनसाखळी हिसकावण्याची ही पहिलीच घटना असावी, तरीदेखील चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दुसरी घटना तासाभरात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. पाथर्डीफाटा परिसरातील नरहरी लॉन्सजवळून फिर्यादी पौणिर्मा राजेश पवार (39,रा. बिष्णोई अपाटर्मेंट) यादेखील भाजीपाला खरेदी करून घरी पायी परतत असताना त्यांच्या समोरील बाजूने काळ्या रंगाच्या दुचाकीने दोघे अज्ञात इसम आले व त्यांच्यापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. सुमारे 60 हजार रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यानी घेऊन पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुन्हा तिसरी घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली. फिर्यादी छाया विनायक पवार (48, रा. अमृतधाम) या पायी साडे आठ वाजेच्या सुमारास जात असताना अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. यावेळी झटापटीत अर्धा तुटलेला 2100 रुपये किंमतीचा 3 ग्रॅमचे सोने घेऊन चोरटा फरार होण्यास यशस्वी झाला.

भाजीपाला घेणा?्या महिला 'टार्गेट'
सोनसाखळी चोरट्यांनी आता सकाळी 'मॉर्निंग वॉक'ला जाणा?्या वृद्ध महिलाना टार्गेट न करता संध्याकाळी भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडणा?्या मध्यमवयाच्या महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहेङ्घ कोरोनामुळे शक्यतो ज्येष्ठ महिला सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत नाही. यामुळे सोनसाखळी चोरट्यांनी सायंकाळच्या सुमारास विविध भागातील भाजी बाजाराच्या परिसरावर लक्ष ठेवत सोनसाखळी परिधान करून आलेल्या महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी महिलांनी संध्याकाळी भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडताना आपले दागिने साडीच्या पदराखाली झाकून ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयित व्यक्ती नजरेस पडल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी व सतर्क राहावे.

 

Web Title: Gold chain thieves continue to rage in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.