महिलेच्या सतर्कतेमुळे सोनसाखळी चोराला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:11 IST2020-12-27T04:11:21+5:302020-12-27T04:11:21+5:30
गुरुवारी (दि.२४) रात्री त्रिमूर्तीनगर भागात कल्पना ज्ञानेश्वर राऊत याचे आत्मा मालिक नावाचे दुकान आहे. संध्याकाळच्या सुमारास दुकान आटोपत असताना ...

महिलेच्या सतर्कतेमुळे सोनसाखळी चोराला बेड्या
गुरुवारी (दि.२४) रात्री त्रिमूर्तीनगर भागात कल्पना ज्ञानेश्वर राऊत याचे आत्मा मालिक नावाचे दुकान आहे. संध्याकाळच्या सुमारास दुकान आटोपत असताना संशयित
मोहन पांडुरंग गावित (२९, रा.पळसण, ता.सुरगाणा) हा ग्राहकाचा बनाव करत त्यांच्या दुकानात आला. यावेळी त्याने काही वस्तू मागितल्या. यावेळी राऊत त्यांच्या गल्ल्यात पैसे टाकत असताना त्यांची नजर चुकवून संशयित मोहन याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. यावेळी त्यांनी वेळीच दुकानातून बाहेर येत आरडाओरड करत नागरिकांना सावध केले. यावेळी काही नागरिकांनी त्या चोरट्याचा पाठलाग करत त्यास पकडले. नागरिकांनी त्यास चोप देत पोलिसांच्या हवाली केले. यावेळी राऊत यांच्या फिर्यादीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित मोहनविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.