वयोवृद्ध पादचारी महिलेची सोनसाखळी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:14 IST2021-05-26T04:14:26+5:302021-05-26T04:14:26+5:30

सोमवारी भर दुपारच्या सुमारास तपोवन चौफुलीवर चोरट्यांनी वृद्ध महिलेला गाठून सोनसाखळी लंपास केल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घडली ...

Gold chain lamp of an elderly pedestrian | वयोवृद्ध पादचारी महिलेची सोनसाखळी लंपास

वयोवृद्ध पादचारी महिलेची सोनसाखळी लंपास

सोमवारी भर दुपारच्या सुमारास तपोवन चौफुलीवर चोरट्यांनी वृद्ध महिलेला गाठून सोनसाखळी लंपास केल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. याप्रकरणी विजया श्रीधर पाटील (७२, रा. जेजुरकर गल्ली, काठेगल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पालेभाज्या खरेदी करून पाटील पुन्हा आपल्या घराकडे पायी येत होत्या. यावेळी तपोवन चौफुली येथे त्यांच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीची ३० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्यांना काही समजण्याच्या आतच चोरटे तेथून पसार झाले. यामुळे चोरट्यांचे किंवा दुचाकीचे फारसे वर्णनही त्यांना सांगता आला नाही. घटना घडल्याने त्या भेदारून गेल्या होत्या. चोरट्यांकडून पुन्हा एकट्या ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा धडाका सुरू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Gold chain lamp of an elderly pedestrian