गोखले संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय अजिंक्य व्हॉलीबॉल : आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

By Admin | Updated: September 2, 2014 01:13 IST2014-09-01T21:42:07+5:302014-09-02T01:13:15+5:30

गोखले संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय अजिंक्य व्हॉलीबॉल : आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

Gokhale Institute Engineering College, Ajinkya Volleyball: Intercollegiate Competition | गोखले संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय अजिंक्य व्हॉलीबॉल : आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

गोखले संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय अजिंक्य व्हॉलीबॉल : आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

 

प्रतिनिधी नाशिक, दि. २८ : सिन्नर येथे पार पडलेल्या विभागीय आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीचे सपट आभियांत्रिकी महाविद्यालय अजिंक्य ठरले. मालेगाव महाविद्यालय विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यास सपट महाविद्यालयाने मालेगाव कॉलेजचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या विजयाबरोबरच सपट महाविद्यालयातील दोन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. आर.एच. सपट महाविद्यायाने मिळविलेल्या यशामुळे या संघाचे प्रशिक्षक नितीन गांगुर्डे यांचीही विभागीय स्पर्धेच्या संघ व्यवस्थापकपदी निवड जाहीर करण्यात आली आहे, तर राहुल गुणवंते आणि अमित अहेर या खेळाडूंचीही विभागीय संघात निवड झाली. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत एकूण ३३ संघांनी सहभाग घेतला होता. सपट महाविद्यालयाच्या संघात रोहन साळवे, राहुल गुणवते, अमित अहेर, विनय काळोखे, जिब्रान शेख, उदय महिरे, पंकज सावडतकर, साहिल देसाई, ओमकार जोशी या खेळाडूंचा सहभाग होता. खेळाडूंना प्राचार्य पी. सी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Gokhale Institute Engineering College, Ajinkya Volleyball: Intercollegiate Competition