घरी जाऊन लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST2021-04-11T04:14:41+5:302021-04-11T04:14:41+5:30
रोजच्या रोज लसीकरण केंद्रावर होणाऱ्या नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याने प्रभाग ३ मध्ये ...

घरी जाऊन लसीकरणाची मागणी
रोजच्या रोज लसीकरण केंद्रावर होणाऱ्या नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याने प्रभाग ३ मध्ये ४५ वर्षांपुढील व सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रशासनाने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी नगरसेवक रुची कुंभारकर यांनी केली आहे.
पंचवटी मनपा नागरी आरोग्य तपासणी केंद्र व काही ठिकाणी प्रशासनाने लसीकरण केंद्र सुरू केले आहे. परिसरात नागरिक संख्या मोठी असून लस घेण्यासाठी नागरिक ठराविक केंद्रावर गर्दी करतात. कोरोना साखळी घट्ट होत चालल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. मनपाने प्रभाग ३ मधील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करणारे पथक मुबलक लससाठा, डॉक्टर, परिचारिका पथक प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टळेल त्यामुळे प्रशासनाने मनुष्यबळ, रुग्णवाहिका, साधन साहित्य, उपलब्ध करून द्यावे यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पत्र देणार आहे.