जाता जाता करणार निधी नियोजन
By Admin | Updated: February 28, 2017 01:08 IST2017-02-28T01:08:27+5:302017-02-28T01:08:43+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १३ किंवा १४ मार्च रोजी होण्याची शक्यता असून, या सर्वसाधारण सभेत मावळते पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाचे निधी नियोजन करणार आहेत.

जाता जाता करणार निधी नियोजन
नाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १३ किंवा १४ मार्च रोजी होण्याची शक्यता असून, या सर्वसाधारण सभेत मावळते पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाचे निधी नियोजन करणार आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने सभेसाठी जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी तारीख देण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. यापूर्वीची सर्वसाधारण सभा १६ डिसेंबर २०१६ रोजी झाली आहे. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभा १६ मार्च म्हणजेच तीन महिन्यांच्या आत होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने चुंबळे यांच्याकडे सर्वसाधारण सभेची तारीख देण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. मावळत्या वर्षात जिल्हा परिषदेचा सुमारे ३८ कोटींची अर्थसंकल्प बांधकाम तथा अर्थ समिती सभापती प्रकाश वडजे यांनी मांडला होता. आता फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला होणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पीय सभेत जि. प. उपाध्यक्ष वडजे निधी नियोजनाचा आढावा सादर करून त्यास जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मंजुरी घेतील. त्यानुसार पुढील वर्षाचे कामाचे नियोजन होणार आहे. नूतन जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड २१ मार्च रोजी होणार असल्याने तुर्तास जुनेच मावळते पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. (प्रतिनिधी)