सरकारी नोकरांची युतीलाच पसंती टपालात गोडसे आघाडीवर; भुजबळांना पिछाडी

By Admin | Updated: May 17, 2014 00:45 IST2014-05-17T00:01:21+5:302014-05-17T00:45:47+5:30

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांनी केलेल्या पोस्टल मतदानातही सेनेचे हेमंत गोडसे यांनाच पसंती देण्यात आली आहे. एकूण मतदानाच्या निम्मे मतदान एकटे गोडसे यांना मिळाले असून, छगन भुजबळ दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

Godse leads the government's choice; Bhujbal's retreat | सरकारी नोकरांची युतीलाच पसंती टपालात गोडसे आघाडीवर; भुजबळांना पिछाडी

सरकारी नोकरांची युतीलाच पसंती टपालात गोडसे आघाडीवर; भुजबळांना पिछाडी

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांनी केलेल्या पोस्टल मतदानातही सेनेचे हेमंत गोडसे यांनाच पसंती देण्यात आली आहे. एकूण मतदानाच्या निम्मे मतदान एकटे गोडसे यांना मिळाले असून, छगन भुजबळ दुसर्‍या क्रमांकावर आहेत.
निवडणुकीचे काम सोपविलेल्या कर्मचार्‍यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल मतपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या व त्याचे वाटप प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले होते. ज्यांना पोस्टल मतपत्रिका देण्यात आली त्यांनी त्यावर आपले मत नोंदवून सदरचा लिफाफा पोस्टाद्वारे किंवा त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुरुवार, दि. १५ मे रोजी दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. नाशिक लोकसभा मतदारसंघात २१९५ पोस्टल मते प्राप्त झाली होती. त्यातून गोडसे यांना ११३०, तर भुजबळ यांना ६७३ मते मिळाली. डॉ. प्रदीप पवार यांना ११४, विजय पांढरे यांना ३८, दिनकर पाटील यांना १३ व तानाजी जायभावे यांना १८ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार सखावतखॉँ पठाण यांना ३ मते मिळाली, तर ११ मतदारांनी यापैकी कोणी नाही असे म्हटले आहे. निवडणुकीचे काम करणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांनी मतदान करताना चुका केल्याने सुमारे १९८ मते बाद ठरविण्यात आली आहेत.
सकाळी आठ वाजता पोस्टल मतदान मोजण्यासाठी चार टेबल लावण्यात आले होते. अगोदर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. साधारणत: ११ वाजेपर्यंत ती पूर्ण करण्यात आली. अर्थात ही मोजणी करताना पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात आला. सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे करण्यात आले व त्यानंतर मोजणीला सुरुवात करण्यात आली.

Web Title: Godse leads the government's choice; Bhujbal's retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.