गोडसे ठरले जायंट किलर आघाडी कायम : भुजबळांना प्रत्येक फेरीत दिली मात

By Admin | Updated: May 17, 2014 00:43 IST2014-05-17T00:01:26+5:302014-05-17T00:43:13+5:30

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते इतकेच नव्हे तर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीहे पद भूषवित असलेल्या छगन भुजबळ यांचा धक्कादायक पराभव करीत शिवसेनेचे हेमंत गोडसे जायंट किलर ठरले आहेत. मतदानाचे गुपित मतमोजणीच्या वेळी उकलले आणि सर्वांनी हीच प्रतिक्रिया व्यक्त केली.

Godse decides to win the Giant Killer League: Bhujbal is given every round | गोडसे ठरले जायंट किलर आघाडी कायम : भुजबळांना प्रत्येक फेरीत दिली मात

गोडसे ठरले जायंट किलर आघाडी कायम : भुजबळांना प्रत्येक फेरीत दिली मात

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते इतकेच नव्हे तर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीहे पद भूषवित असलेल्या छगन भुजबळ यांचा धक्कादायक पराभव करीत शिवसेनेचे हेमंत गोडसे जायंट किलर ठरले आहेत. मतदानाचे गुपित मतमोजणीच्या वेळी उकलले आणि सर्वांनी हीच प्रतिक्रिया व्यक्त केली.
छगन भुजबळ व हेमंत गोडसे यांच्या लढतीकडे नाशिकच नव्हे, तर सार्‍या राज्याचे लक्ष लागून होते. गेल्या वेळी समीर भुजबळ यांच्याशी दोन हात करणार्‍या गोडसे यांनी त्यांना चांगलेच जेरीस आणले होते. त्यावेळी समीर भुजबळ यांचा निसटता म्हणजे फक्त २२ हजार मतांनी विजय झाला होता. यंदा छगन भुजबळ यांच्यासारखा वजनदार नेता समोर असल्याने गोडसे यांच्यासमोर आव्हान होते; परंतु त्यांनी ते लिलया पेलले आणि मतदान यंत्रातही ते दिसून आले.
पहिल्या फेरीत भुजबळ यांच्यापेक्षा गोडसे ७ हजार १०९ मतांनी पुढे होते. त्यानंतर दुसर्‍या फेरीत ६ हजार ३६८ मतांनी आणखी मताधिक्य वाढले आणि ते एकूण मताधिक्य १३ हजारांवर गेले. त्यानंतर तिसर्‍या फेरीत तर १० हजार ३१३ मताधिक्य मिळवले. चौथ्या फेरीत ६ हजार ५५३, पाचव्या फेरीत ११ हजार २२४, सहाव्या फेरीत ७ हजार ७९८, सातव्या फेरीत ५ हजार ९१५ असे मताधिक्य वाढत गेले. आठव्या फेरीलाच गोडसे यांचे एकूण मताधिक्य ४९ हजार ३६० म्हणजेच सुमारे पन्नास हजार मतांवर गेले होते. त्यानंतर मताधिक्य ५५ हजार २८० वर गेले. नवव्या फेरीत भुजबळांपेक्षा १८०३ इतकीच आघाडी गोडसेंना मिळाली. परंतु त्यावेळी सर्व फेर्‍या मिळून एकूण मतांची आघाडी ६७ हजार ८४१ वर गेली होती. हीच आघाडी वाढत गेली आणि बाराव्या फेरीअंती १ लाख ७ हजार ९५७ इतकी आघाडी झाली. भुजबळ यांना ही आघाडी कमी करून त्यापेक्षा अधिक आघाडी घेणे अखेरपर्यंत शक्य झाले नाही. सोळाव्या फेरीत हेच मताधिक्य दीड लाखांवर पोहोचले. एकूण १ लाख ५४ हजार ८७ मतांची आघाडी गोडसे यांना मिळाली आणि तेविसाव्या म्हणजेच अखेरच्या फेरीत १ लाख ८७ हजार ३३६ मतांनी भुजबळांचा पराभव झाला अन् गोडसे खर्‍या अर्थाने जायंट किलर ठरले.

Web Title: Godse decides to win the Giant Killer League: Bhujbal is given every round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.