गोदाकाठी, सिग्नलवर बिच्चारी बालके
By Admin | Updated: July 8, 2014 00:56 IST2014-07-07T22:40:41+5:302014-07-08T00:56:01+5:30
गोदाकाठी, सिग्नलवर बिच्चारी बालके

गोदाकाठी, सिग्नलवर बिच्चारी बालके
शहरातील जवळपास सर्वच सिग्नलवर भीक मागताना अनेक बालके दृष्टीस पडतात. अंगावर धड कपडे नाहीत, केसांचे चऱ्हाट झालेले, हातापायावर जखमा, डोळ्यांवर प्रचंड ताण आणि खपाटीला गेलेले पोट. या मुलांना पाहून अनेकांना दया येते, काही भीक देतात, तर काही भिकेचा फंडा म्हणून या मुलांना झिडकारतातही. परंतु या कोवळ्या मुलांना या भिकेच्या व्यवसायात कसे आणले जाते, कोण आणतो, या मागचे नेमके अर्थकारण काय याचा विचार करण्याला कुणालाही सवड नाही. शहरातील गोदाकाठावरही अशा प्रकारची मुले बेवारस स्थितीत भीक मागताना आढळून येतात. या बालकांच्या आयुष्याविषयी कुणीही गांभीर्याने पाहत नाही. शहरात कितीही सामाजिक संस्था, सेवाभावी ट्रस्ट असल्या तरी त्यांना या बालकांविषयी काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसते. बालभिकारी निर्मूलनासाठी फारसे काम होताना दिसत नाही.