शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

देवीचा माथा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘हवाई वारी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:52 PM

अंबिकानगर येथील मुलांनी नव्हे तर पालकांनीही फक्त आकाशात बघितलेल्या विमानात प्रत्यक्षात आपल्या पाल्याला बसण्याचा योग पिंपळगाव बसवंत येथील देवीचा माथा शाळेच्या वतीने आला आहे.

ठळक मुद्देउपक्रम : मुख्याध्यापक, शिक्षक स्वखर्चाने करणार विमानाच्या तिकिटासह दहा दिवसांच्या सहलीचा खर्च

गणेश शेवरे ।पिंपळगाव बसवंत : अंबिकानगर येथील मुलांनी नव्हे तर पालकांनीही फक्त आकाशात बघितलेल्या विमानात प्रत्यक्षात आपल्या पाल्याला बसण्याचा योग पिंपळगाव बसवंत येथील देवीचा माथा शाळेच्या वतीने आला आहे.शाळेतील मुलांचे परीक्षांचा काळ पुढे असल्याने शाळांमध्ये गॅदरिंगसह सहलींचे बेत आखले जात आहेत. सहलीच्या आठवणी पुस्तकातील ‘पिंपळपान’ किंवा मोरपिसासारख्या अलगद मनामध्ये जपून राहाव्यात, असेच प्रत्येकाला वाटत असते. हेच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पिंपळगावच्या एका शाळेतील विद्यार्थी यंदा दिल्लीच्या सहलीवर जात आहेत आणि तेही शिक्षकांनी स्वखर्चातून नियोजित केलेला दहा दिवसांच्या दिल्ली सहलीवर ते थेट विमानातून. आतापर्यंत शाळेच्या मैदानावरून उंच आकाशात दिसणाऱ्या या विमानामध्ये प्रत्यक्ष बसायला मिळत असल्याचा आनंद या विद्यार्थ्यांमध्ये असून, या ग्रामीण भागातूनही १० विद्यार्थ्यांनी सहलीसाठी नोंदणी केली आहे.एरव्ही हवेत इवलीशी वाटणारी आणि प्रत्यक्षात अवाढव्य असणारी विमाने, हवेत झेपावताना होणारा घरघर आवाज आणि उडाल्यानंतर दिसेनासे होईपर्यंत त्यांचे हवेत तरंगणे... लहान मुलांच्या भावविश्वात या साºयाचे अप्रूप असते. हाच आनंद आणि कुतूहल सोमवारी (दि. ) जिल्हा परिषद देवीचा माथा या शाळेत शिक्षण घेणारे आदिवासी मुले अनुभवणार आहे.शाळा आणि आपल्या वस्तीभोवती घुटमळणाºया आयुष्यातून बाहेर पडत स्वप्नांच्या आकाशात उंच भरारी घेणार आहेत.दुसºयाच्या बांधावर मोलमजुरी करणाºया आई-वडिलांचा हात धरून शाळेत येणाºया मुलांना भविष्यात आपल्यालाही मजुरीच करावी लागणार व हेच आपले जग असल्याचे मानणारे चिमुकले विमानांच्या जगात हरवून जाणार आहेत. मुख्याध्यापक देवेंद्र वाघ व शिक्षक इम्रान पठाण, संजय वाघ, रणजित देवरे, मंगला देवरे, सुरेखा जाधव आदी शिक्षकांनी प्रयत्न केला आहे व ते यशस्वी होणार आहेत.हे विद्यार्थी घेणार विमानातून भरारीमुख्याध्यापक देवेंद्र वाघ, शिक्षक इम्रान पठाण यांच्यासह विद्यार्थी यश पवार, अविनाश लोखंडे, अक्षय गोधवणे, विशाल गांगोडे, किरण जोपुळे, अनुष्का वाघ, अर्चना वायकंडे, मंगला वाघ, कोमल गुप्ता, धनश्री महाले. ३ ते ४ हजार कुटुंबांची वस्ती असलेल्या या अंबिकानगर आदिवासी वस्तीतील मुले शाळेत जाण्याऐवजी आई-वडिलांसह मजुरी करायला जात असतात. मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी नागरिक, शिक्षक, सेवाभावी वृत्तीने काम करीत मुलांना प्रबोधन करतात व आता ही मुले आकाशात झेप घेणार असल्याने पालक व विद्यार्थी आनंदित झाले आहे़‘‘विमानात बसण्याची ओढ प्रत्येकालाच असते. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना विमानाबाबतची उत्सुकता अधिक असते. आता परिस्थिती बदलली आहे. खेड्यातील प्रतिष्ठित माणसेही विमानाने जात आहेत, मात्र सामान्य घरातील विद्यार्थ्यांना हे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन आणि विमानाप्रति त्यांचा उत्साह पाहून आम्ही हे ठरविले. मागील तीन-चार महिन्यांपासून ही तयारी सुरू आहे. पालकांचे सहकार्य यात महत्त्वाचे आहे.’’- देवेंद्र वाघ, मुख्याध्यापक, देवीचा माथा शाळा, पिंपळगाव बसवंतविमान फक्त ढगात आम्ही पाहिले आणि त्या आकाशात उडणाºया विमानात आमची मुलं बसून दिल्लीला जाणार हा त्या मुलांच्या रूपाने आम्हीच दिल्लीला जाणार असल्याचे वाटू लागले. येथील शिक्षकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, त्याच्यामुळेच आमच्या मुलांचे स्वप्न आकाशात भरारी घेणार. - धनराज महाले, पालक अंबिकानगर

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा