गोदाकाठी अद्यापही जनजीवन विस्कळीत

By Admin | Updated: August 7, 2016 01:52 IST2016-08-07T01:52:26+5:302016-08-07T01:52:44+5:30

गोदाकाठी अद्यापही जनजीवन विस्कळीत

Goddess still disrupts life span | गोदाकाठी अद्यापही जनजीवन विस्कळीत

गोदाकाठी अद्यापही जनजीवन विस्कळीत

पंचवटी : गेल्या मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी आलेल्या पुरामुळे परिसरातील विविध व्यावसायिक तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुरामुळे झालेल्या नुकसानीतून सावरत असतानाच शनिवारी आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या संकटात आणखी भर पडली आहे.
पूर ओसरल्यानंतर बुधवार व गुरुवारी सायंकाळपर्यंत जीवाचे रान करून दुकानांची तसेच घरांची साफसफाई केल्यानंतर पुन्हा पूर आल्याने नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहे. नदीकाठच्या टपऱ्या तसेच दुकानात पुराचे पाणी शिरल्याने पावसामुळे जखमेवर मीठ. चोळल्यागत परिस्थिती झाल्याचे नागरिकांनी बोलून दाखविली. (वार्ताहर)

Web Title: Goddess still disrupts life span