शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी गोदाप्रेमी करणार परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:19 IST

रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीसमोरील अहल्यादेवी पटांगणापासून रविवारी सकाळी परिक्रमेला सुरुवात झाली. शहर परिसरातील गोदाप्रेमींसह जिल्ह्यातून सुमारे ५० गोदाप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.

ठळक मुद्देगोदावरीचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी निर्धारगोदाप्रेमींनी अनेक ठिकाणच्या नोंदी घेत प्रदूषणमुक्तीसाठी काय करता येऊ शकेल, याबाबत चर्चा परिक्रमा आता प्रत्येक महिन्याच्या दुस-या रविवारी करण्याचा ठराव

नाशिक : धार्मिक महत्त्व असलेल्या पंचवटीतून जाणा-या गोदावरीपात्राची परिक्रमा करून गोदावरीचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी निर्धार करण्यात आला. रामकुंड ते तपोवन अशा मार्गाने निघालेल्या परिक्रमेत गोदाप्रेमींनी गोदापात्राची पाहणी करीत प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.रामकुंड ते तपोवन या मार्गाने करण्यात आलेल्या परिक्रमेत गोदाप्रेमींनी अनेक ठिकाणच्या नोंदी घेत प्रदूषणमुक्तीसाठी काय करता येऊ शकेल, याबाबत आपसात चर्चा केली. गोदावरीचे प्रदूषण आणि पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा तसेच पात्रात सोडलेले सांडपाणी असे प्रकार पाहून साºयांचेच मन हेलावून गेले. रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीसमोरील अहल्यादेवी पटांगणापासून रविवारी सकाळी परिक्रमेला सुरुवात झाली. शहर परिसरातील गोदाप्रेमींसह जिल्ह्यातून सुमारे ५० गोदाप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते. गोदाकाठाने सुरू झालेल्या या मोहिमेत अनेक ठिकाणी गटारीचे पाणी गोदापात्रात सोडण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. त्याचप्रमाणे नदी प्रवाहात निर्माल्य, प्लॅस्टिक टाकल्याचेही निदर्शनास आले. ही सारी परिस्थिती पाहून हे मार्ग बंद करण्याबाबत पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले.तपोवनात रामसृष्टी उद्यानातील अ‍ॅम्पी थिएटरच्या जागेत काहीकाळ थांबले. या ठिकाणी शिल्पा डहाके, नीलेश गावडे, रमेश पडवळ आदींनी गोदापरिक्रमेचे महत्त्व आणि राबवायच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. गोदावरीच्या सुशोभिकरणापेक्षा गोदापात्राच्या किना-यावरील हालचाली बंद करून किनारे सुरक्षित आणि संरक्षित करण्याबरोबरच काही ठिकाणी निर्बंध घालण्याचीही चर्चा करण्यात आली.रविवार, दि. १० रोजी राबविण्यात आलेली ही परिक्रमा आता प्रत्येक महिन्याच्या दुस-या रविवारी करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. तपोवनातील कपिला संगम पूल, परतीच्या मार्गाने लक्ष्मीनारायण पुलाखालच्या भागातून पुन्हा गोदाकाठाने यशवंत महाराज पटांगण, होळकर पुलाखालून रामवाडी पूल ओलांडून गोदापार्क येथून पुन्हा दुतोंड्या मारुती असा या परिक्रमेचा मार्ग निश्चित करण्यात आला असून, यापुढील परिक्रमेत नाशिककर, गोदाप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :godavariगोदावरीpollutionप्रदूषणNashikनाशिक