शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

गंगापूर धरणातून विसर्ग वाढविल्याने गोदावरीला पुन्हा पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 1:16 AM

सोमवारी (दि.९) पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढला. यामुळे गंगापूर धरणातून सकाळपासून विसर्गात सातत्याने वाढ केली गेली. सायंकाळपर्यंत गोदापात्रात ३ हजार ४२६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

नाशिक : सोमवारी (दि.९) पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढला. यामुळे गंगापूर धरणातून सकाळपासून विसर्गात सातत्याने वाढ केली गेली. सायंकाळपर्यंत गोदापात्रात ३ हजार ४२६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. यामुळे गोदापात्रातील दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली, तर गंगा गोदावरी मंदिरालाही पुराच्या पाण्याचा वेढा पडला. संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेल्यामुळे गोदावरीला पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले.सुमारे वीस दिवसांपासून पावसाने शहरात उघडीप दिली होती; मात्र पुन्हा मागील दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आहे. सोमवारी पहाटेपासून शहरात सरींनी चांगला जोर धरला. पहाटेपासून मध्यम सरींची संततधार सुरू झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.८ मिलीमीटर इतका पाऊस शहरात नोंदविला गेला. तसेच जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने या दोन्ही धरणांमधून विसर्ग वाढविला गेला. गोदावरीच्या पातळीत दुपारी २ वाजेनंतर कमालीची वाढ झाली. यामुळे रामकुं ड, देवमामलेदार मंदिर, निळकंठेश्वर मंदिर परिसरातील विक्रेत्यांची यामुळे धावपळ उडाली. विक्रेत्यांनी सरदार चौक-कपालेश्वर मंदिर रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली होती. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर रात्रीतून पुन्हा वाढल्यास मंगळवारी विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.गंगापूर गावाजवळील बालाजी मंदिराजवळ असलेला दूधस्थळी (सोमेश्वर) धबधबा महिनाभरानंतर पुन्हा खळाळला. गंगापूर धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्यामुळे धबधबा खळाळला आहे.विसर्जनाला जाताना खबरदारी घ्यागोदाकाठालगत सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विशेषत: गणपती विसर्जनासाठी जाताना नदीकाठापासून सुरक्षित अंतरावर थांबावे, गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करून दान करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तीन दिवसांपूर्वीच गणेश विसर्जनासाठी दारणा नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्या युवकाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरgodavariगोदावरी