शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाट पुन्हा बिबट्याच्या दहशतीखाली

By admin | Updated: August 9, 2015 23:39 IST

बळींची संख्या वाढली : वनविभागाचे होत आहे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष

लासलगाव : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील दहावर्षीय विकी शांताराम पिठे या चौथीतील विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. तालुक्यातील नांदूरमधमेश्वर परिसरात तीन बिबट्यांचा मुक्तसंचार असूनही याकडे वन विभागाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजून किती लोकांच्या बळींची वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी वाट पाहणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.आठ महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यातील पिठे हा सहावा बळी असून, यापूर्वी सायखेडा येथील ऊसतोड कामगाराच्या मुलाला बिबट्याने शिकार बनविले. शिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू झाला. भुसे येथील शुभम पोटे याचा, तर म्हाळसाकोरे येथील ढोबळे या इसमाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सध्या बिबट्याच्या भीतीने शेतमजूर कामावर जाण्यास घाबरत असून, शेतीची कामेही ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. एकप्रकारे कोणतीही संचारबंदी नसताना हा परिसर बिबट्याच्या दहशतीने अघोषित संचारबंदीचा अनुभव घेत आहे.तालुक्यातील मांजरगाव, भुसे, चाटोरी, बेरवाडी, करंजगाव, सोनगाव, शिंगवे, चापडगाव, कुरडगाव, कोठुरे, सुंदरपूर, जळगाव, काथरगाव व नांदूरमधमेश्वर परिसरात महिनाभरापासून बिबट्याचा पुन्हा मुक्तसंचार सुरू आहे. नैसर्गिक भक्ष्य मिळणे दुरापास्त झाल्याने भुकेपोटी ही जंगली श्वापदे आता रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांनाही लक्ष्य करू लागली आहेत. तीन ते चार वर्षांपासून सातत्याने उन्हाळ्यात एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत या भागातील काही गावांना बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. अडीच-तीन वर्षांपूर्वी शिवरे गावातील दोन लहान बालकांना एकाच महिन्यात बिबट्याने शिकार केले होते. उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून पल्लवी सानप ही लहान मुलगी व आजोबा सायंकाळी घराच्या अंगणात बसले होते. आठ-साडेआठ वाजेची वेळ होती. अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या भुकेल्या बिबट्याने लहान पल्लवीला तिच्या आजोबादेखत हल्ला करून पळवून नेले. तेव्हा काही अंतरावर उसाच्या शेतात शिकार झालेल्या अवस्थेत पल्लवीचा मृतदेह आढळून आला होता, तर ही घटना घडण्याच्या पंधरा दिवस अगोदर याच गावातील दुर्गेश गोसावी या अवघ्या एकवर्षीय बाळाला बिबट्याने ठार केले होते. या नरभक्षक बनलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शिवरे येथील दोघा लहानग्यांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शिवरे फाटा येथे नाशिक-औरंगाबाद महामार्ग पावणेदोन तास रोखून धरला होता. वन खात्यानेही ठिकठिकाणी पिंजरे लावले. मात्र दरवेळी या बिबट्याने हुलकावणी देत महिनाभर परिसरात आपली दहशत कायम ठेवली.