नाशिक : माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती.दरवर्षी माघ शुद्ध दशमीला गोदावरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हा जन्मोत्सव श्री गंगा गोदावरी माघ मास जन्मोत्सव म्हणून ओळखला जातो. गंगा-गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघाच्या वतीने रामकुंडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बुधवारी (दि.२४) सप्तमीला यज्ञ भूमिपूजन दुपारी पार पडले. दशमीच्या मुहूर्तावर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेदहा ते दुपारपर्यंत गोदा जन्माचे कीर्तन व विश्वकल्याणार्थ पंचदिन जन्मोत्सव महापूजा शिव-पंचायतन महायज्ञ पूजा करण्यात आली. तसेच संध्याकाळी साडेसात वाजता गोदावरी जन्मोत्सवानिमित्त विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, भक्तिचरणदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, नगरसेवक हेमलता पाटील, डॉ. प्रशांत पाटील, गोदावरी सेवा समितीचे देवांग जानी, गोदाप्रेमी राजेश पंडित आदी मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरोहित अतुल गायधनी, वैभव दीक्षित, मधुकर दीक्षित यांनी गणपती व गोदा आरतीचे पठण केले. गोदावरी नदीची स्वच्छता कायम राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे गोदाप्रदूषणमुक्तीसाठी नाशिककर म्हणून प्रयत्न करावे, असे आवाहन सानप यांनी केले.
गोदा जन्मोत्सव : १८०० दिव्यांचा नाशिकच्या रामकुंडावर लखलखाट; महाआरतीसाठी लोटली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 21:41 IST
अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती.
गोदा जन्मोत्सव : १८०० दिव्यांचा नाशिकच्या रामकुंडावर लखलखाट; महाआरतीसाठी लोटली गर्दी
ठळक मुद्देगोदा प्रदूषणमुक्तीची शपथगोदावरी प्रदूषित होऊ देणार नाही व कोणाला करूही देणार नाही, अशी प्रतिज्ञा