..पण मंदिरात देवच नाही

By Admin | Updated: May 8, 2016 00:13 IST2016-05-07T22:58:47+5:302016-05-08T00:13:35+5:30

नांदगाव पंचायत समिती : पंचायतराज समिती सदस्यांच्या भावना

..but God is not God in the temple | ..पण मंदिरात देवच नाही

..पण मंदिरात देवच नाही

नांदगाव : तालुक्यात पंचायत समितीची देखणी इमारत म्हणजे मंदिर आहे, मात्र या ठिकाणी देवच नसल्याची भावना तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायतराज त्रिसदस्यीय समितीच्या पथकाने व्यक्त केली.
कामकाज आटोपल्यानंतर सभापती कमलताई सोनावणे यांच्या दालनात समितीचे सदस्य आमदार उन्मेष पाटील, नागपूरचे आमदार हेमंत पाटील, नांदेडचे आमदार विकास कुंभारे यांनी पत्रकारांशी अनोपचारिक गप्पा मारताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पंचायतींचे बळकटीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा दावा करताना आमदार त्रयींनी जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या तालुक्यात पंचायत स्तरावर विभाग प्रमुखांची असलेली वानवा व आस्थापनेवरची रिक्त पदे त्यामुळे लोकाभिमुखता कशी होणार या प्रश्नावर सकारात्मकता दर्शवित आमदार उन्मेष पाटील यांनी योजना राबविताना पदाधिकाऱ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.
आम्हाला चार तालुके दिल्याने नांदगावपर्यंत पोहचण्यास झालेल्या उशिरामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या समस्या समजून घेता आल्या नसल्याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली. शालेय पोषण आहार, पेयजल योजनेबाबत असलेल्या अडचणी समितीच्या निदर्शनास आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एरवी सायंकाळी पाचच्या सुमाराला तालुका पंचायत समितीत फारसे कुणी उपस्थितीत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्र वारी मात्र पंचायतराज समिती येणार म्हणून रात्री उशिरापर्यंत कधी न लागलेल्या दिवाबत्तीचा उजेड खूप काही सांगून जाणारा ठरला.
येवल्याहून रात्री पावणेनऊ वाजता पथकाचे आगमन झाले. त्यानंतर सभागृहात स्वागताचा सोहळा संपल्यावर कामकाजाला प्रारंभ झाला. कक्ष अधिकारी सचिन बाभळगावकर, प्रतिवेदक अरु ण भोंगे, प्रशासन अधिकारी राजाराम दिघे आदिंचा पथकात समावेश होता. पंचायतराज समितीचे सदस्य आमदार उन्मेश पाटील यांनी समितीच्या दौऱ्याचा उद्देश सांगितला.
पंचायतराज समिती उलटतपासणीला नव्हे तर माहिती घेण्यासाठी आल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे कोणीही असत्य माहिती देऊ नये, सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कक्ष अधिकारी बाभळगावकर यांनी साक्षीचे नियम व समिती हक्काचे वाचन केले. समितीचे कामकाज गोपनीय असल्याने गटविकास अधिकारीवगळता पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगून प्रश्नावलीचे वाचन करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: ..but God is not God in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.