‘देव, गुरूबाबत समर्पणाचा भाव हवा’
By Admin | Updated: July 14, 2014 00:31 IST2014-07-14T00:18:55+5:302014-07-14T00:31:25+5:30
‘देव, गुरूबाबत समर्पणाचा भाव हवा’

‘देव, गुरूबाबत समर्पणाचा भाव हवा’
नाशिकरोड : देव, गुरू आणि धर्म याबाबत प्रत्येकाने आदर बाळगला पाहिजे आणि त्यांच्याप्रति समर्पणाचा भाव कायम राखला पाहिजे, असे प्रतिपादन गौतममुनीजी यांनी केले. येथील जैन श्रावक संघामध्ये आयोजित प्रवचनात बोलताना गौतममुनीजी म्हणाले, कारले जरी कडू असले तरी त्याच्यात औषधी गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे गुरू हा शिष्याच्या मनातील अज्ञानरुपी अंधकार दूर करून त्याला ज्ञानाचा प्रकाश दाखविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पैशाने आपण सर्व सुखे खरेदी करीत असलो तरी आई, वडील आणि गुरू यांना खरेदी करता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जगात ३११ प्रकारचे गुरू असतात, असे सांगून त्यांनी या विविध प्रकारांचे सविस्तर वर्णन केले. आपण गुरुंप्रति समर्पण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये स्पर्धा
नाशिक : येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयटी पिरॅमिड’ स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत हार्डवेअर आणि नेटवर्किंग, माहिती तंत्रज्ञान, वेब तंत्रज्ञान आणि माहिती संरक्षण या विषयावर विविध प्रश्न विचारण्यात आले. संगणक प्रशिक्षक दीपू पिल्लई व शिक्षिका मयुरी यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.
वाघ शाळेत भेटकार्ड बनविण्याची स्पर्धा
नाशिक : सरस्वतीनगर येथील क. का. वाघ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भेटकार्ड बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कलाशिक्षक अश्विनी बैरागी यांनी मुलांना भेटकार्ड बनविण्यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक सिमरन मखिजानी उपस्थित होत्या.