सटाण्यात रस्त्यावर शेळ्या-मेंढ्या

By Admin | Updated: September 15, 2015 22:55 IST2015-09-15T22:53:38+5:302015-09-15T22:55:18+5:30

सटाण्यात रस्त्यावर शेळ्या-मेंढ्या

Goats and sheep on the road in the street | सटाण्यात रस्त्यावर शेळ्या-मेंढ्या

सटाण्यात रस्त्यावर शेळ्या-मेंढ्या

सटाणा : तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीच्या सवलती जाहीर कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेळ्या-मेंढ्या आणून शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ तब्बल एक तास विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग अडवून धरला. पोलिसांनी आमदार दीपिका चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांना अटक करून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांची अर्ध्या तासांनंतर सुटका करण्यात आली.
पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र भीषण दुष्काळी परिस्थिती असताना राज्य व केंद्रातील सरकारने उपाययोजना करण्याऐवजी शेतकऱ्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. अशा नाकर्त्या मुख्यमंत्र्यांचा यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी निषेधाचा ठराव मांडला. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात
आले.
आमदार दीपिका चव्हाण, पालिकेचे गटनेते काका रौंदळ, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, संजय सोनवणे, पांडुरंग सोनवणे, महेंद्र शर्मा, विजय वाघ यांनीही आपल्या भाषणात सरकारवर टीकेची झोड उठवत तब्बल एक तास राज्यमार्ग अडवून धरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी सुमारे दीडशे कार्यकर्त्यांना अटक केली.
आंदोलनात किरण पाटील, वसंतराव भामरे, गणेश जाधव, पंडितराव अहिरे, रत्नाकर सोनवणे, शिवा सोनवणे, भारत खैरनार, भारत काटके, फईम शेख, अमोल बच्छाव, काका सोनवणे, नितीन सोनवणे, बाला सूर्यवंशी, मिलिंद शेवाळे, दगा सोनवणे, वंदना भामरे, शिवाजी पवार, दिलीप सोनवणे, विजय अहिरे, एस.टी. देवरे, आनंद सोनवणे, आबा सोनवणे, झिप्रू सोनवणे यांच्यासह दीडशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Goats and sheep on the road in the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.