मनमाडला बिबट्याच्या अफवेने घबराट हिंस्त्रप्राण्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:56 IST2018-03-03T23:56:20+5:302018-03-03T23:56:20+5:30

मनमाड : शहरातील पांझण नदी परिसरात हिंस्त्रप्राण्याने हल्ला करून शेळीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

Goat wounds Manmad in a panic attack | मनमाडला बिबट्याच्या अफवेने घबराट हिंस्त्रप्राण्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

मनमाडला बिबट्याच्या अफवेने घबराट हिंस्त्रप्राण्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

ठळक मुद्देकर्मचार्यांनी घटनस्थळी जाऊन पाहणी केलीहिंस्र प्राण्याने शेळीवर हल्ला करून जखमी केले

मनमाड : शहरातील पांझण नदी परिसरात हिंस्त्रप्राण्याने हल्ला करून शेळीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. शेळीवर हल्ला करणारा प्राणी बिबट्या असल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. दरम्यान पोलीस व वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनस्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना पायाचे ठसे पाहिल्यानंतर ते बिबट्याचे नसून तरसाचे असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. शहराच्या मधून वाहणार्या पांझन नदीला खेटून असलेल्या वसाहती जवळ रात्री एका हिंस्र प्राण्याने शेळीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. वसाहतीत बिबट्या आला होता आण ित्याने शेळीला जखमी केल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडून भीती पसरली. पोलिस व वन विभागाच्या कर्मचार्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना त्या ठिकाणी पायाचे ठसे आढळून आले ते पाहून ठसे बिबट्याचे नाही तर तरसाचे असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
जर बिबट्याने हल्ला केला असता तर त्याने शेळीला ठार केले असते असे ही वन विभागाच्या कर्मचार्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Goat wounds Manmad in a panic attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ