नायगावला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By Admin | Updated: July 2, 2014 00:30 IST2014-07-01T22:25:20+5:302014-07-02T00:30:23+5:30

नायगावला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

The goat is killed in a leopard attack by Naigala | नायगावला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

नायगावला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

 

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या
उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून
बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा दहशत वाढली आहे. येथील खालकर वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार झाल्याची घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.
सिन्नर व निफाड तालुक्याच्या सरहद्दीवरील खालकर वस्ती येथील निवृत्ती रामभाऊ खालकर यांच्या घरासमोर शेळ्यांचा कळप दावणीला बांधला होता. रात्रीच्या वेळी बाहेर उजेड असतानाही बिबट्याच्या जोडीने शेळीवर हल्ला केला. बाहेर शेळ्यांच्या धडपडण्याचा व कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजामुळे खालकर कुटुंबीय बाहेर आल्यावर बिबट्यांनी शेळीला ओढून
नेल्याने तसेच गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. ही शेळी ओढताना तेथे असलेल्या मोठ्या लाकडाला अकडली होती मात्र तरीही बिबट्याने लाकडासह शेळी उसाच्या फडाकडे ओढून
नेली. कुटुंबीयांनी बिबट्यांना
पळवून लावल्यानंतरही रात्री पाच वेळेस दबा धरून बसलेले बिबटे वस्तीकडे येत होते. त्यामुळे खालकर कुटुंबाला रात्र जागून काढावी लागली.
परिसरातील सावळी गावाच्या परिसरासह गोदावरी नदीच्या गंगाथडीला बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. या परिसरात बिबट्याला पिण्यासाठी पाणी व लपण्यासाठी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर
आहे. उसाच्या शेतातून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याने
भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: The goat is killed in a leopard attack by Naigala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.