चास येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By Admin | Updated: May 13, 2014 00:02 IST2014-05-13T00:02:39+5:302014-05-13T00:02:39+5:30
नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोर्यातील चास शिवारात शनिवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली.

चास येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोर्यातील चास शिवारात शनिवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली. या भागात पाण्याच्या शोधासाठी येणार्या बिबट्यांच्या डरकाळ्यांनी शिवार दणाणून गेला असून, शेतकरी धास्तावले आहेत. येथील भोजापूर धरणाच्या कालव्यालगत रानमळा भागातील मारुती पंढरीनाथ भाबड यांच्या शेतात तुकाराम भाबड यांनी शेळ्यांचा कळप बसविलेला होता. शनिवारी रात्री बिबट्याने अंधाराचा आधार घेत शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. त्यात एका बकराचा गळा घोटला. मात्र यावेळी कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोरदार आवाज व शेळ्यांच्या धडपडीचा आवाज ऐकून जवळच असलेल्या भाबड व शेजार्यांनी आरडाओरड केली. ते पाहून बिबट्याने बकराला सोडून जंगलाकडे धूम ठोकली. यापूर्वी याच भागात बिबट्याने शेळी फस्त केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पिंजरा लावण्यात आला आहे. (वार्ताहर)